आईंची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:48+5:302021-07-18T04:28:48+5:30
नंदकिशाेर नारे वाशिम : गत दाेन वर्षांपासून काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा हळूहळू उघडण्यास सुरुवात ...
नंदकिशाेर नारे
वाशिम : गत दाेन वर्षांपासून काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी मुलाचे भवितव्य पाहता काळजावर दगड ठेवून त्यांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ८ वी ते १२ वीपर्यंतच्या ग्रामीण भागातील एकूण २७५ शाळा आहेत. यापैकी केवळ ७८ शाळांना सुरुवात झाली आहे. शहरी भाागतील शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येत असून, यालाही ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ ७८ गावांतील शाळांनीच ठराव घेतल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत, तसेच शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमतीसुद्धा आवश्यक असल्याने अद्याप माेठ्या प्रमाणात शाळा सुरू झाल्या नाहीत.
--------------
शाळेतून घरी येताच कपडे बदला; आंघाेळही करा
काेराेनाचा संसर्ग पाहता आई-वडिलांकडून मुलगा शाळेतून आल्याबराेबर कपडे बदलून आंघाेळ घालण्यात येत आहे, तसेच शाळेत पाठविताना काही सूचनांचे पालन करण्यास पालकांकडून सांगण्यात येत आहे. ताेंडाचा मास्क काढू नये, साेबत दिलेल्या सॅनिटायझरने वारंवार हात धुवावा, एकाच ठिकाणी जास्त मुलांच्या मधे राहू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच आपल्या मित्रांनासुद्धा याबाबत सांगावे, अशा सूचना पालकांकडून पाल्यांना देण्यात येत आहेत.
-------------
अ) मास्क काढू नये
ब) वारंवार हात साबणाने धुवावेत किंवा सॅनिटायझर वापरावे
क) साेशल डिस्टन्सिंग पाळावे
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघाेळ करावी
----------
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे
गत दाेन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन क्लासेस झाले; परंतु शाळेतील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये फरक आहे. मुलांची काळजी आहे, पण त्यांचे भवितव्यही पाहावे लागेल.
-उज्ज्वला दानतकर
पालक, कारखेडा
मुलांचे भवितव्य पाहता मुलांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शिक्षकांसह मुलांनाही काळजी घेण्याबाबत सांगितले आहे. शिक्षकही मुलांवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
-लता गणेश लाेंढे
पालक, काेंडाेली
प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असतेच. भविष्यात त्याने काही तरी करावे यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. याकरिता काेराेना नियम त्याला सांगून खबरदारी घेऊन शाळेत पाठवीत आहाेत.
-अनिता शंबाेले
पालक, काेंडाेली
--------
जिल्ह्यातील एकूण शाळा २७५
सुरू झालेल्या शाळा ७८
अद्याप बंद शाळा १९७