वापटा शिवारात मोटार सायकलने डवरणी

By admin | Published: June 29, 2017 07:53 PM2017-06-29T19:53:21+5:302017-06-29T20:08:50+5:30

मानोरा : तालुक्यातील मौजे वापटा शेतशिवारात २९ जुन रोजी शेतकरी पुत्रांनी नवीन शक्कल लढवत मोटार सायकलने डवरणीचा प्रयोग केला.

Motor Bike Wrapper in Vantaa Shivar | वापटा शिवारात मोटार सायकलने डवरणी

वापटा शिवारात मोटार सायकलने डवरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील मौजे वापटा शेतशिवारात २९ जुन रोजी शेतकरी पुत्रांनी नवीन शक्कल लढवत मोटार सायकलने डवरणीचा प्रयोग केला व बैलाने डवरणी केल्यापेक्षा मोटर सायकलने कमी खर्चात जास्त शेती डवरणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मौजे वापटा येथील शेतकरी दिलीप कृ ष्णा राठोड यांनी आपली मोटार सायकल शेतमजूर उमेश राठोड व पवन राठोड यांना सोबत घेवुन २९ जुन रोजी शेतात मोटर सायकलने सोयाबीनच्या शेतात डवरणी केली. एका दिवसात मोटार सायकलने ५ एकर शेती डवरणी होते तसेच ४ लिटर मोटर सायकलला पेट्रोल लागत.त्यामुळे मोटर सायकलने केलेली डवरणी कमी खर्चात होते अशी माहिती शेतकऱ्याने दिली.

भाड्याने डवरणी महागात
या शेतकऱ्याने जाळे भाड्याने लावुन डवरणी केली असती तर ३०० रुपये एकर प्रमाणे १५०० रुपये मोजावे लागले असते. तसेच मोटर सायकलने ५ एकर डवरणी केली असता चार लिटर पेट्रोलचे ३८० व दोन मजुराचे ४०० असे एकुण ७८० रुपयात डवरणी झाली. कमी खर्चात शेती करणाऱ्या वापटा येथील शेतकरी दिलीप राठोड यांचे कौतुक होत आहे.

 

Web Title: Motor Bike Wrapper in Vantaa Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.