बहुजन कर्मचारी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:24+5:302021-04-18T04:40:24+5:30
शेतकरी, मजूर यांच्या विरोधामध्ये असलेल्या कायद्यांविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनने काळी फ़ित आंदोलन १९ एप्रिलपासून २३ ...
शेतकरी, मजूर यांच्या विरोधामध्ये असलेल्या कायद्यांविरोधात
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनने काळी फ़ित आंदोलन १९ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत आयोजित केले आहे.
२९ कामगार कायदे रद्द केल्याने कामगार कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला, असे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने निवेदनात म्हटले आहे. कृषी कायद्याला विरोध, नवीन शिक्षा नीती २०२० ला विरोध तसेच सरकारी उद्योग आणि कंपनीच्या खासगीकरणाचा विरोध,
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीला समर्थन,
पदोन्नतीमधे आरक्षण लागू करावे, या मागणीच्या समर्थनार्थ
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, नवी दिल्ली या देशव्यापी ट्रेड युनियनचेवतीने १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत काळी फ़ित आंदोलन केले जाईल. या आंदोलनात कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मानोरा तालुका संयोजक उत्तम सोळंके यांनी केले आहे.