कर विभाग स्थानांतरणाच्या हालचाली सुरु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 16:08 IST2019-03-11T16:07:52+5:302019-03-11T16:08:15+5:30
वाशिम : वाशिम येथे झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतींमध्ये स्थानांतरणाच्या कामास सुरुवात झाली असून कर विभागाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

कर विभाग स्थानांतरणाच्या हालचाली सुरु!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथे झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतींमध्ये स्थानांतरणाच्या कामास सुरुवात झाली असून कर विभागाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. ११ मार्च कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकाचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जिल्हयातील सर्वात मोठया ईमारत असलेली वाशिम नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतीचे उदघाटन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. ८ मार्च जागतिक महिला दिनी संपूर्ण जुन्या नगरपालिकेतील विभागाचे स्थलांतर करण्यात येणार होते. परंतु काही अडचणींमुळे त्यात विलंब झाल्याने एक एक विभागाचे स्थलांतरण करण्यात येत आहे. कर विभाग नविन ईमारतीत कार्यरत झाला असून कामकाजासही सुरुवात करण्यात आल्याची माहिती करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार यांनी दिली.
जुन्या ईमारतीपेक्षा नविन ईमारतीमध्ये नागरिकांना बसण्यासाठी जागेसह सर्व सुविधायुक्त विभाग तयार करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे असल्याने कर विभाग सुटीच्या दिवशी सुरु राहत असून रात्री उशिरापर्यंत अधिकारी कर्मचाºयांच्यावतिने कामे करण्यात येत आहेत. कार्यालयामध्ये ठरलेल्या प्रभागानुसार कर वसुलीसाठी टेबल ठेवण्यात आले आहेत. येणाºया नागरिकांचा कर भरण्याचे कार्य मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, के.आर हडपकर, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहे.