सोमवारी आरक्षण बचावकरिता आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:08+5:302021-03-22T04:37:08+5:30
२००५च्या शासन निर्णयानुसारचे कर्मचारी अधिकारी पदोन्नतीकरिता ते ३३ टक्के पदोन्नतीच्या कोट्यात पात्र आहेत ते आता १०० टक्के खुल्या प्रवर्गातिक ...
२००५च्या शासन निर्णयानुसारचे कर्मचारी अधिकारी पदोन्नतीकरिता ते ३३ टक्के पदोन्नतीच्या कोट्यात पात्र आहेत ते आता १०० टक्के खुल्या प्रवर्गातिक पदोन्नतीच्या प्रक्रियेत अपात्र होणार आहेत,व ते न्याय मागण्यासाठी कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही, ही बाब सर्व बहुजन समाजाच्या कर्मचारी अधिकारी यांचे हक्कावर गदा आणणारी आहे याचा विरोध केला पाहिजे, व हा शासन निर्णय रद्द केला पाहिजे.या मागणी करिता संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आहे. मानोरा येथे दुपारी २ वाजता तहसील कार्यालयावर काही मोजक्या कार्यकर्त्यांनी काळी फीत लावून निवेदन दिले जाणार आहे.तरी आरेमबीकेएस,प्रोटान विंग व बहुजन कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रोटान विंगचे अध्यक्ष उमेश सोळंके, सुभाष मोरकर, माणिक डेरे, चिंतामण कळंबे, गजानन भोरखडे, आनंद खुळे, संजय व्यवहारे आदींनी केले आहे.