‘मजीप्रा’च्या कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:21+5:302015-12-05T09:09:21+5:30
वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनामार्फत अदा होत नसल्यानेच आंदोलन.
वाशिम: शासनाच्या अन्यायकारक तथा जाचक नियमांना कंटाळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचार्यांनी ३ डिसेंबरला काळ्या फिती लावून कामकाज करीत शासकीय धोरणांचा निषेध नोंदविला. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचार्यांवर अन्याय चालविला आहे. शासकीय ध्येय-धोरणानुसारच कामकाज करीत असतानाही शासनाने ह्यमजीप्राह्णच्या कर्मचारी वर्गास आपलेसे करून घेतले नाही. वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनामार्फत अदा होत नसल्यानेच आंदोलन करावे लागत असल्याचे संबंधितांनी सांगितले.