महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 05:26 PM2019-03-08T17:26:20+5:302019-03-08T17:26:24+5:30
वाशिम: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दालनात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाºयांशी ७ मार्च रोजी दुपारी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शिक्षकेतरांनी आंदोलन मागे घेतले.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्यावतीने ५ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर ७ मार्च २०१९ रोजी दुपारी २.३० वा. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री विनोदजी तावडे यांच्या दालनात महासंघाच्या पदाधिकाºयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून नियमित करण्याबाबत संबंधित अधिकाºयांना समक्ष आदेश देण्यात आले, तसेच तो पर्यंत ज्या कर्मचाºयांना दुसºया सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे, तो तसाच चालू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक तसेच सर्व विभागीय सहसंचालकांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्याशिवाय संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाºयावर आकसाने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे महाविद्यलयीन कर्मचाºयांनी ५ मार्च २०१९ पासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आणि राज्यभरातील महाविद्यालयील कर्मचाºयांना ८ मार्च २०१९ पासून कामावर पूर्ववत रुजु होण्याच्या सुचना महासंघाच्यावतीने देण्यात आल्या.