कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:04 PM2020-12-15T12:04:52+5:302020-12-15T12:05:03+5:30

Washim News १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले.

Movement to protest against agricultural laws | कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन

कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटत आहेत. १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांतील शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत; परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करणे अपेक्षित असताना, नुकतेच शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केले असा आरोप करीत हे तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 
या आंदोलनाचे तीव्र पडसाद अन्यत्रही उमटत असून, वाशिम येथे १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी केले. शेतकरी हिताच्या आड येणारे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली. 
यावेळी राकॉंचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, डॉ. रवी जाधव, चक्रधर गोटे, दिलीप देशमुख, गजानन आरु, गजानन गोटे, सूर्यप्रकाश दहात्रे, दिलीप जाधव, बबनराव चोपडे, पुंडलिक ठाकरे, विनोद जोगदंड यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Movement to protest against agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.