कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 03:38 PM2019-03-20T15:38:33+5:302019-03-20T15:38:51+5:30
वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास २१ मार्च रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निवासस्थानासमोर बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि उप सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मागील चार महिन्यांपासुन तालुकास्तरीय व दोन महिन्यांपासुन जिल्हास्तरीय कर्मचारी यांचे वेतन झाले नाही. मागील वर्षभरापासुन कर्मचा-यांना प्रवास भत्ता मिळाला नाही. तीन- तीन महिने कर्मचारी यांना पगार मिळाला नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याबाबत यापुर्वीही राज्यस्तरावर कळविण्यात आले होते. तसेच विभागीय आयुक्तांना भेटुन निवेदन दिले होते. शासनाच्या पत्रानंतर केवळ एकदा वेतन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कक्षातील कर्मचारी यांना लक्ष्य करण्यात आले होते. आकसापोटी काहींची चौकशी लावली होती तर काही कर्मचारी यांना मुळ वेतनावर आणले आहे, असा आरोप कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. केंद्र शासनाच्या निवडलेल्या भारतातील १०१ आकांक्षित जिल्हयात वाशिमचा समावेश आहे. वेतन न झाल्याने कर्मचाºयांसह कुटुंबियांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. काही कर्मचाºयांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, या मागणीसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले असून, तिसºया दिवशीही कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनावर होते.