खासदार गवळींनी संसदेत मांडला महिला सक्षमीकरणचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:34+5:302021-02-17T04:49:34+5:30
वाशीम : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकरीत्या सुदृढ करण्यासाठी संपूर्ण देशात महिला बचत गट योजना लागू करावी अशी विनंती ...
वाशीम : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकरीत्या सुदृढ करण्यासाठी संपूर्ण देशात महिला बचत गट योजना लागू करावी अशी विनंती करत खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला.
वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी लोकसभेत चर्चेदरम्यान देशातील महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न मांडला. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी देशातील प्रत्येक राज्यात महिलांच्या उत्कर्षाच्या योजना महिला बचत गटांना जादा निधी व अधिकार देऊन राबविण्यात याव्यात, असे प्रतिपादन करत यामुळे खऱ्या अर्थाने देशातील महिला सक्षम होतील असे खासदार गवळी यांनी याप्रसंगी लोकसभेत मांडले. ज्या राज्यांनी महिला बचत गट योजना अद्याप लागू केली नसेल याची केंद्र सरकारने चौकशी करावी व अशा सर्व राज्यांना महिला बचतगट योजना सक्तीची करण्याबाबत महिला व बालकल्याण मंत्रालयाने निर्णय घ्यावा, असे गवळी यांनी लोकसभेत सांगितले.