खासदाराच्या स्वीय सहायकाला जीवे मारण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:16 AM2017-07-20T01:16:38+5:302017-07-20T01:16:38+5:30

रिसोड पोलीस ठाण्यात सारडा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

MP threatens killer! | खासदाराच्या स्वीय सहायकाला जीवे मारण्याची धमकी!

खासदाराच्या स्वीय सहायकाला जीवे मारण्याची धमकी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : खासदार भावना गवळी यांचे खासगी स्वीय सहायक अशोक गांडुळे यांना वाशिमचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिसोड शहर पोलीस स्टेशनला सारडा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये १८ जुलै रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गांडुळे यांना हरीश सारडा यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की आपण रिसोड येथील आपल्या घरी असताना सारडा यांनी फोनवर आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली बदनामी व्हावी व मानसिक स्वास्थ्य बिघडावे, या उद्देशाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक मजकूर प्रसारित करीत आहेत. राजकीय क्षेत्रात व समाजात मानहानी व्हावी, हा उद्देश ठेवून सारडा यांनी बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गांडुळे यांनी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. या तक्रारीहून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: MP threatens killer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.