महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:03 PM2019-02-25T18:03:09+5:302019-02-25T18:03:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांसह कृषी, वाणिज्यिक आणि औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे सद्या ४०० ...

MSEDCL drive to cut electricity connection of pendings | महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका!

महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांसह कृषी, वाणिज्यिक आणि औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे सद्या ४०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यापैकी घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी सद्या महावितरणची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून वीज देयक अदा न करणाºया ग्राहकांची वीज तोडणी कपात करण्याची धडक कारवाई केली जात आहे.
जिल्ह्यात सद्या कृषीपंपाची थकबाकी तब्बल ३९३ कोटींवर पोहचली आहे. यासह २५ फेब्रुवारीपर्यंत घरगुती देयकांची थकबाकी ३० कोटींपेक्षा अधिक, वाणिज्यिक प्रकारातील ग्राहकांकडे असलेली थकबाकी ४ कोटी; तर औद्योगिक प्रकारातील थकबाकी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहिम हाती घेतली असून जे ग्राहक वसूलीसाठी प्रतिसाद देत नाहीत, त्यांची वीज कपात करण्याची धडक कारवाई सद्या केली जात आहे.
 
विद्यूत ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा वाढतच चालला असून महावितरणला यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचण जाणवत आहे. ग्राहकांनाही सुरळित वीज पुरवठा करता येणे यामुळे अशक्य होत आहे. ही बाब लक्षात घेवून ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करून अप्रिय कारवाई टाळावी.
- व्ही.बी. बेथारिया
अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

Web Title: MSEDCL drive to cut electricity connection of pendings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.