महावितरणचा ‘शाॅक’; मीटर रीडिंग उशिराचा ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:11+5:302021-07-24T04:24:11+5:30
वाशिम: मीटर रीडिंग उशिरा घेतल्या जात असल्याने ग्राहकांना जास्त बिल येत असल्याची एकीकडे ओरड हाेत असतांना वीज वितरण ...
वाशिम: मीटर रीडिंग उशिरा घेतल्या जात असल्याने ग्राहकांना जास्त बिल येत असल्याची एकीकडे ओरड हाेत असतांना वीज वितरण कंपनीकडून मात्र रीडिंग कधीही घेतले तरी ग्राहकांना त्याचा फटका बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीतर्फे युनिटनुसार स्लॅब पाडण्यात आले आहेत. १०० युनिटपर्यंत विजेचा वापर केल्यास काेणत्या किती रुपयाने आकारणी करावी व त्यापेक्षा जास्त वापर केल्यास काय आकारणी करावी. परंतु युनिट रीडिंग घेण्यास उशीर करीत असल्याने ग्राहकांना फटका बसत असल्याचे सर्वत्र बाेलल्या जात आहे. वेळेवर रीडिंग घेऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी आहे.
....
ही घ्या उदाहरणे
उदाहरण १ : वाशिम येथील बंडू देवकते, रा. शुक्रवार पेठ यांच्या भाागात नेहमीच रीडिंग घेणारा दाेन-दाेन महिन्यांपर्यंत येत नसल्याने जादा बिल येत असल्याचे सांगितले.
उदाहरण २ : वीज मीटर रीडिंग घेणारा व्यक्ती मी कधीच पाहिला नाही. रीडिंग काेणत्याप्रकारे घेतल्या जाते हेही कळत नाही. याचा फटका बिलात दिसून येताे असे देवपेठ येथील गजानन पैनकर यांनी सांगितले
......
मिटर रिडींग उशिरा घेतल्यानंतरही ग्राहकांना याचा फटका बसत नाही. कारण महावितरण कंपनीकडून युनिटचे विभाजन केल्या जाते. एक दिवस आधी किंवा नंतरही रीडिंग घेतल्यास ३० किंवा ३१ दिवसाचे प्रत्येकी रीडिंगनुसारच बिलाची आकारणी करण्यात येते.
-आर.जी.तायडे
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, वाशिम
......
० ते १०० युनिट
वीज ग्राहकाने ० ते १०० युनिटपर्यंत वीजेचा वापर केल्यास त्याला प्रति युनिट ३.४४ रुपये प्रमाणे १०० युनिटचे पैसे आकारले जातात.
१०१ पासून ३०० युनिट
१०० च्यावर युनिट विजेचा वापर केल्यास ३०० युनिटपर्यंत ७.३४ पैसे प्रमाणे पैसे आकारले जातात.
३०१ ते ५०० युनिट
३०१ ते ५०० युनिट विजेचा वापर केल्यास १०.३६ रुपये युनिटप्रमाणे वीज बिलात आकारणी केल्या जाते.
५०१ ते १००० युनिट
५०१ ते १००० व त्यापेक्षा जास्त युनिटच्या वापराला ११.८२ रुपये .
......
महावितरणचे ग्राहक
घरगुती ...१६५५३९
कृषी.. ६२०००
औद्योगिक ... २१६०