‘म्युकरमायकोसिस’ परतीच्या मार्गावर; जिल्ह्यात २ रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:17 PM2021-07-11T12:17:24+5:302021-07-11T12:17:33+5:30
Mucormycosis News : जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाशिम : जिल्ह्यात दुसºया लाटेदरम्यान म्यकुरमायकोसिसचेही रुग्ण आढळून आले होते. दुसरी लाट ओसरत असल्याने ‘म्युकरमायकोसिस’ही परतीच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुसºया लाटेत कोरोनानंतर रुग्ण, नागरिकांसमोर म्युकरमायकोसिसचे (बुरशीमुळे होणारा आजार ) नवे संकट उभे ठाकले होते. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाºया या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. म्युकरमायकोसिसने ११ मे रोजी जिल्ह्यात पहिला बळी घेतला. २० जूनपर्यंत म्युकरमायकोसिचे रुग्ण अधिक संख्येने होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आपसूकच ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येतही घट आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. ‘म्युकरमायकोसिस’ परतीच्या मार्गावर असला तरी नागरिकांनी गाफील राहू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. करमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्कस, वाशिम