नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 03:41 PM2019-08-27T15:41:36+5:302019-08-27T15:41:46+5:30

संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नालंदा नगरातील महिलांनी २७ आॅगस्ट रोजी केली. 

Mud on the streets of Nalanda nagar; The disadvantages of students | नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय

नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक नालंदा नगर येथील अंगणवाडी केंद्राकडे जाणाºया रस्त्यावर चिखल होत असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नालंदा नगरातील महिलांनी २७ आॅगस्ट रोजी केली. 
पावसामुळे नालंदा नगरातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंगणवाडी केंद्राकडे जाणाºया रस्त्यावरील पुलानजीक चिखल साचला आहे. त्यामुळे लहान मुले आणि महिलांची ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडीतील मुलांना हा रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला व चिमुकल्या विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेता संबंधित यंत्रणेने रस्ता दुरूस्ती करणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप रस्ता दुरूस्ती केली नाही किंवा त्या ठिकाणी मुरूमही टाकला नाही. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नालंदा नगरातील दिपाली श्रृंगारे, गिता तायडे, वनिता गवई, जयश्री अंभोरे, सुनिता जाधव, कविता मोरे, उमा चेके, दीपमाला कल्ले, भावना कल्ले, बलखंडे, साळवे यांच्यासह  महिलांनी केली.

Web Title: Mud on the streets of Nalanda nagar; The disadvantages of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम