वाशिम जिल्ह्यातील ५३ प्रकल्पातून होणार गाळाचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:33 PM2019-04-05T14:33:54+5:302019-04-05T14:34:17+5:30
वाशिम: महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३ प्रकल्पांतून गाळाचा उपसा आणि तीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३ प्रकल्पांतून गाळाचा उपसा आणि तीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ४७ लाख २१ हजार ६५४ रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून, संबंधिताना या कामांसाठी जेसीबीची मागणी नोंदविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जलसंधारणाची कामे बंद करण्यात आली होती. तथापि, गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा होतो. धरणांची खोली वाढून अधिक जलसंचय झाल्याने पाणीटंचाईसह सिंचन समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होते, तसेच धरणातील गाळामुळे शेतजमीनही सुपिक होण्यास मदत होते. आचारसंहितेमुळे हे अभियानही थांबले होते; परंतु पुढे पावसाळा लागणार असल्याने या अभियानातून कामे करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानेच या अभियानातील कामे करण्यास मुभा दिली आहे. त्यानंतर या अभियानाचे जिल्हास्तर अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकार कक्षेनुसार गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २ कोटी ४७ लाख २१ हजार ६५४ रुपयांच्या खर्चाच्या ५६ कामांना मान्यता दिली आहे. यामुळे संबंधित प्रकल्पांची खोली वाढून मोठ्या प्रमाणात जलसंचय होईल, तसेच शेतकºयांना या गाळामुळे जमीन सुपिक करण्यासही मदत होणार आहे.
शेतकºयांना मोफत गाळ
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातील कामांतून निघणारा गाळ शेतकºयांना मोफत दिला जाणार आहे. ही कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत जेसीबी मशीनने करण्यात येणार असून, यासाठी मागणी नोंदविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. शेतकºयांना केवळ गाळ शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी स्वत: ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांचा खर्च करावा लागणार आहे.