मालेगांव तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत मुदंडा विद्यालयाचा प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:51 PM2017-12-27T13:51:20+5:302017-12-27T14:02:43+5:30

मालेगांव: तालुक्यातील शिरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात  आल्या.त्यामध्ये मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व  विद्यालयाचे नाव उज्वल केले.

Mudanda School's first number in Malegaon taluka dance competition | मालेगांव तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत मुदंडा विद्यालयाचा प्रथम क्रमांक

मालेगांव तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत मुदंडा विद्यालयाचा प्रथम क्रमांक

Next
ठळक मुद्देमूंदड़ा विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यामध्ये पद्मावती चित्रपटातील ‘घुमर रे’ या गाण्यावर डान्स करून प्रथम क्रमांक पटकावला . त्यामध्ये त्यांना तीन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले .


मालेगांव:- तालुक्यातील शिरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व  विद्यालयाचे नाव उज्वल केले.

        कै . कोंडबा तात्या ढवळे विद्यालय,  श्री संत ओंकारगिर बाबा कनिष्ठ महाविद्यालय आणि अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल शिरपूर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय शालेय नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी तालुक्यात जवळपास २० शाळांना या स्पर्धेत भाग घेतला होता त्या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातून  मालेगाव येथील नाना मूंदड़ा विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यामध्ये पद्मावती चित्रपटातील ‘घुमर रे’ या गाण्यावर डान्स करून प्रथम क्रमांक पटकावला . त्यामध्ये त्यांना तीन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नारायण  मोठी देसाई होते. उद्घाटक म्हणून मालेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजेंद्र शिंदे

तर प्रमुख उपस्तिथि म्हणून  शिरपुर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक डॉ गजानन ढवळे , संस्थेचे अध्यक्ष वामनराव ढवळे,  केंद्रप्रमुख संतोष मुसळे , पंचायत समिती सदस्य शिल्पा पंकज देशमुख , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे होते .या नृत्यात मृणाल नवघरे , भूमि तायडे, प्रणाली आंधळे , जयश्री मीश्रा, प्रतीक्षा घुगे ,दुर्गा महाकाळ ,आदिती चोपड़े, नेहा बळी ,पल्लवी भांदुगेर्, मनस्वी जाधव या विद्यार्थिनीनि सहभाग घेतला होता. 

Web Title: Mudanda School's first number in Malegaon taluka dance competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.