‘मुद्रा’च्या जिल्हास्तरीय समितीत होणार फेरबदल; लोकसंख्येनुसार ठेवली जाणार सदस्यसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:45 PM2018-01-31T13:45:41+5:302018-01-31T13:50:44+5:30
वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे.
वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे.
यासंदर्भात नियोजन विभागाने ३० जानेवारी रोजी पारित केलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे, की यापूर्वी मुद्रा बँक योजनेच्या जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये ४ अशासकीय सदस्यांची नेमणूक होत असे. त्याऐवजी आता जिल्हानिहाय समन्वयक समितीमधील अशासकीय सदस्यांची संख्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार, राज्यातील २५ लाखांपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये अशासकीय सदस्यांची संख्या ६ राहणार असून २५ ते ५० लक्ष लोकसंख्येसाठी ९ आणि ५० लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात १२ अशासकीय सदस्य राहणार आहेत. याशिवाय नव्याने गठीत केल्या जाणाºया जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजनेच्या समन्वयक समितीमध्ये जिल्हा माहिती अधिकाºयांऐवजी जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव राहतील; तर जिल्हा माहिती अधिकारी सदर समितीचे सदस्य राहतील, असे कळविण्यात आले आहे.
यासंदर्भातील नियोजन विभागाचे निर्देश प्राप्त झाले असून मुद्रा बँक योजनेची समिती नव्याने गठीत करित असताना त्याचे पालन केले जाईल. योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी देखील सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत.
- राहुल व्दिवेदी
जिल्हाधिकारी, वाशिम