"मुद्रा" योजनेसाठी वर्षभर चकरा मारुनही पदरी उपेक्षाच!

By admin | Published: April 25, 2017 07:48 PM2017-04-25T19:48:11+5:302017-04-25T19:48:11+5:30

वाशिम- व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘मुद्रा’ योजनेंतर्गत कर्ज मागणाºया नागठाण येथील युवकास वर्षभरापासून बँकेकडून नकारघंटा ऐकावयास मिळत आहे.

For the "Mudra" scheme, all the time, despite losing the whole year! | "मुद्रा" योजनेसाठी वर्षभर चकरा मारुनही पदरी उपेक्षाच!

"मुद्रा" योजनेसाठी वर्षभर चकरा मारुनही पदरी उपेक्षाच!

Next

वाशिम- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या "मुद्रा" योजनेतून व्यवसायासाठी कर्ज घेण्याच्या हेतूने नागठाणा येथील युवक मुरलीधर जनार्दन सोळंके यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुनही गेल्या वर्षभरापासून त्यांना बँकेकडून केवळ नकारघंटाच ऐकावयास मिळत आहेत. तसेच प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून या युवकाची बोळवण करण्यात येत असल्यामुळे ह्यमुद्राह्ण योजनेचा लाभ गरजवंतांना देण्यासाठी अधिकार्‍यांची मानसिकता आड येत असल्याचे चित्र सोळंके यांच्या प्रकरणातुन दिसत आहे. याप्रकरणी मुरलीधर सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २४ एप्रिल रोजी तक्रारवजा निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली असून १ मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषणाचे रणशिंग फूंकले आहे.

Web Title: For the "Mudra" scheme, all the time, despite losing the whole year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.