उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:13 PM2017-09-26T20:13:50+5:302017-09-26T20:14:10+5:30
मानोरा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल. २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल. २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या अनुषंगाने इच्छुक ग्रामपंचायत उमेदवारी उमेदवारांनी दाखल करण्यात आली. यावेळी सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेकांनी गुडग्याला बाशींग बांधुन ग्रामपंचायतच्या रणसंग्राम मध्ये उडी घेतली. गावपुढाºयानी भक्कम जनाधार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, परंतु उमेदवार विजयी करण्यासाठी कोणाची उमेदवारी डोकेदुखी ठरवु शकते यासाठी गटातटाचे राजकारण गती आली आहे. त्यासाठी डोकेदुखी ठरु शकत असलेल्या उमेदवारांना मनधरणी करण्यासाठी स्थानिक गावपुढाकाºयाला कमालीचा कस लागत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला जात या व्यक्तीरिक्त गावपुढाºयांनी नातेवाईकांकडून समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह घेवुन उमेदवारी जरी नसली तरीही अप्रत्यक्ष रित्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप गावपातळीच्या राजकारणात पहावयास मिळत आहे किमान आपल्या पक्षाचे सरपंचाच्या माध्यमातून अधिक आधिक ग्रामपंचायती ताब्यात असल्या पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. थेट जनतेतून सरपंचपद असल्यामुळे भक्कम जनाधार प्रतिष्ठा असलेला सरपंच होईल यात शंका नाही परंतु वर्षभरानंतर लागणाºया पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा संभाव्य उमेदवार त्याकडे पाहिले जात आहे.