अतिवृष्टीतून मुंगळा मंडळ वगळले; चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांकडून निषेध
By संतोष वानखडे | Published: October 26, 2022 06:23 PM2022-10-26T18:23:33+5:302022-10-26T18:27:43+5:30
मुंगळा मंडळमधील शेतकऱ्यांना ना नापिकीची मदत मिळाली, ना पिक विम्याची मदत मिळाली.
वाशिम (संतोष वानखडे) : मालेगाव तालुक्यातील मुंगळा मंडळ अतिवृष्टीतुन वगळल्याने शेतकरी संतापले आहेत. बुधवारी (दि.२६) शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन निषेध व्यक्त करीत आंदोलन छेडले.
मुंगळा मंडळ मधील शेतकऱ्यांना ना नापिकीची मदत मिळाली, ना पिक विम्याची मदत मिळाली. दिवाळीच्या अगोदर मदत देऊ म्हणणाऱ्या सरकारने तोंडाला पाने पुसली, असा आरोप करीत मुंगळा मंडळातील शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) उपतालुका प्रमुख भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, डिगंबर पवार, माजी सरपंच रामदास पाटील शेंडगे, माजी सरपंच दीपक पाटील दहात्रे, बाळासाहेब देशमुख, विनोद राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख गजानन केळे, सुरेश राऊत, आशिष डहाळे, दिलीप काकडे, राजू केळे, नारायण काटकर, संतोष केळे, विनोद राऊत, जनार्दन जायभाये, नारायण काटकर, शेषराव पखाले, गजानन पवार, आदिनाथ पवार, संजय नखाते, पांडुरंग केळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.