नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळया फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 15:11 IST2018-12-29T15:10:34+5:302018-12-29T15:11:11+5:30
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९ डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळया फिती लावून कामकाज
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९ डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले.
नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेंशन योजना लागू करावी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बरीच आंदोलने करण्यात आले; परंतु शासन मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करित आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा अंगिकारत महाराष्ट्र राज्य नगर पंचायत, नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना, कर्मचारी महासंघ सलंग्न भारतीय मजदूर संघ,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, सफाई कामगार संघटना, रोजंदारी कर्मचारी कृती समिती, सर्व सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांमधील कर्मचाºयांनी आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारला. त्यानुसार, १५ डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्याने २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. वाशिम येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाºयांनी काळया फिती लावून कामकाज केले. यावेळी विदर्भ संघटक अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष जितु बढेल, वाशिम नगरपरिषद संघटना अध्यक्ष बबन भांदुर्गे, उपाध्यक्ष नाजिम मुल्लाजी, सचिव संजय काष्टे, पंकज सोनुने, राहुल कंकाळ, शिवाजी इंगळे, किशोर हडपकर, मुन्ना खान, धनंजय डाखोडे, राम वानखडे, महल्ले यांच्याह नगरपरिषदेतील सर्व कर्मचाºयांची उपस्थिती होती. तसेच १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाणार असल्याची माहिती विदर्भ संघटक अब्दुल अजिज अब्दुल सत्तार व जिल्हाध्यक्ष जितु बढेल यांनी सांगितले.