काेराेनामुळे नगर परिषद करवसुलीत २० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:35+5:302021-01-22T04:36:35+5:30
वाशिम जिल्ह्यात चार नगरपालिका आहेत. या नगरपालिकांतर्फे शहरवासीयांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांसाठी मालमत्ता, शिक्षण, राेहा, वृक्ष, घनकचरा आदी ...
वाशिम जिल्ह्यात चार नगरपालिका आहेत. या नगरपालिकांतर्फे शहरवासीयांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांसाठी मालमत्ता, शिक्षण, राेहा, वृक्ष, घनकचरा आदी संदर्भातील करवसुली केली जाते. गतवर्षी सर्वत्र काेराेनाने कहर केल्याने याचा परिणाम नगर परिषदेच्या करवसुलीवरही झाल्याचे दिसून येते. वाशिम नगर परिषदेतर्फे १ एप्रिल २०१९ ते २० जानेवारी २०२० पर्यंत तीन काेटी ५९ लाख ३४ हजार ७५४ तर १ एप्रिल २०२० ते २० जानेवारी २०२० पर्यंत दोन काेटी १९ लाख ८ हजार ७०२ रुपये वसुली करण्यात आली. याचप्रमाणे कारंजा नगर परिषदेने गतवर्षी ३८ लाख २६ हजार ७०६ तर चालू वर्षात ५५ लाख ७० हजार ७८, मंगरूळपीर नगर परिषदेने गतवर्षी २६ लाख ८४ हजार ३०६ तर चालू वर्षात २३ लाख ३४ हजार १७४, रिसाेड नगर परिषदेने गतवर्षी १ काेटी ६८ लाख ५८ हजार ९५८ तर चालू वर्षात दोन काेटी १९ लाख ८७०२ करवसुली केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका करवसुलीमध्ये २० टक्के घट दिसून येत आहे.
१०० टक्के करवसुलीसाठी वाशिमचे करनिरीक्षक अ. अजिज अ. सत्तार, कारंजाचे संजय नेरकर, रिसाेडचे वसंत शिंदे व मंगरूळपीरचे शरद इंगाेले प्रयत्न करीत आहेत.
............
नगरपालिकांची २०१९ ते जानेवारी २०२१ ची अशी आहे वसुली
वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिकांची एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० व एप्रिल २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंतची वसुली अनुक्रमे पाच काेटी ९३ लाख चार हजार ७२५ व चार काेटी ९२ लाख ३६३ रुपये एवढी आहे. यामध्ये कारंजा नगर परिषदेंतर्गत हद्दवाढ करण्यात आल्याने १८ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी ३८ लाख २६ हजार ७०६ तर चालू वर्षी ५५ लाख ७० हजार ७८ रुपयांची वसुली झाली आहे.
............
कर थकीत असलेल्यांना देण्यात येईल नाेटीस
काेराेना संसर्गामुळे जिल्ह्यातील चारही नगरपालिका क्षेत्रातील कर विभागातील करनिरीक्षक, करसंग्राहकांसह इतर कर्मचाऱ्यांना काेराेना संसर्ग राेखण्याच्या दृष्टीने कर्तव्य बजावण्यात आले हाेते. यामुळे करवसुली करता आली नाही, शिवाय काेराेनाकाळात लाॅकडाऊन व लाॅकडाऊननंतरही नागरिक घरीच राहल्याने करवसुलीवर परिणाम झाला हाेता. परंतु, आता थकीत कर असलेल्यांना नाेटीस बजावून करवसुली करण्यात येणार आहे. तरीसद्धा करवसुली न झाल्यास मालमत्ता जप्तीचीही कारवाई करण्यात येईल.
- अ. अजिज अ. सत्तार
करनिरीक्षक वाशिम तथा नगर परिषद संंवर्ग कर्मचारी संघटना विदर्भ संघटक
.........
एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२०
५९३०४७२५
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१
४००९२३६३
जिल्ह्यातील न.प. ....०४
करवसुलीत सर्वात जास्त घट
३५ टक्के
करवसुलीत सर्वात जास्त वाढ कारंजा
१८ टक्के