नगर परिषदांना डिसेंबरपूर्वी हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना
By admin | Published: September 27, 2016 02:24 AM2016-09-27T02:24:06+5:302016-09-27T02:45:20+5:30
वाशिम व कारंजा नगरपरिषद हगणदरीमुक्त होण्याची अपेक्षा.
वाशिम, दि. २६- जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात होत असलेल्या स्वच्छ भारत अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन मंगरूळपीर व रिसोड नगरपरिषद डिसेंबर २0१६ पयर्ंत तर वाशिम व कारंजा नगरपरिषद मार्च २0१७ अखेरपयर्ंत हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा हगणदरीमुक्त करण्यासाठी आवश्यक शौचालय बांधकामाची अंतिम संख्या निश्चित करण्यात आली. तसेच स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुख्याधिकार्यांशी संवाद साधला. नगारिकांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ व सुदंर बनविणे आणि हगणदरीमुक्त करण्याच्या सूचनाही द्विवेदी यांनी मुख्याधिकार्यांना केल्या. मंगरूळपीर व रिसोड नगरपरिषद डिसेंबर २0१६ पयर्ंत तर वाशिम व कारंजा नगरपरिषद मार्च २0१७ अखेरपयर्ंत हगणदरीमुक्त होण्याची अपेक्षा जिल्हाधिकार्यांनी बाळगली. शौचालय उभारणी व त्याच्या वापरासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुख्याधिकार्यांना केल्या आहेत.