नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 04:18 PM2020-04-29T16:18:14+5:302020-04-29T16:18:55+5:30

वाशिम येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेकडून काळया फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

Municipal employees protest with black ribbons! | नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध

नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगरपरिषदमधील सफाई कामगार व कोव्हीड -१९ मध्ये काम करणाºया सर्व कर्मचाºयांचा जीवन विमा उतरविण्याबद्दल शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ वाशिम येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेकडून काळया फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. कोरोनासाठी लढा देणाºया ईतर कर्मचाºयांना मात्र विमा उतरवून केवळ नगरपरिषद कर्मचाºयांनाच वंचित ठेवल्याचा आरोप कर्मचाºयांतून केल्या जात आहे.
आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागातील कर्मचाºयांप्रमाणेच नगर विकास विभागातील सफाई कामगार, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी त्याचप्रामणे कार्यालयीन कर्मचारी सुध्दा जीवाचे २ान करुन कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सर्वाेतपरी कामे करीत असतांना केवळ नगर विकास विभागातीलच कर्मचाºयांना जिवन विम्याचे आर्थीक संरक्षणापासून वगळयात आले आहे. यामध्ये शासनाचा दुजाभाव दिसून आल्याने कर्मचाºयांत उदासिनतेचे वातावरण असून यापुढे प्रतिबधात्मक उपाययोजनेची कामे जिव धोक्यात घालून करण्यास शासनाकडून कसलेही संरक्षण नसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण जास्तीत जास्त शहरी भागातच आढळून येत आहेत. याकरिता नगरविकास विभागातील कर्मचाºयांना त्यांचे कुटुंबियांचे संरक्षणार्थ जिवन विमा उतरविण्याकरिता नगर परिषद कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता काळया फिती लावून शासनास निवेदन सादर केले. यावेळी कर निरिक्षक कर्मचारी संघटनेचे विदर्भ संघटक अ.अजीज अ. सत्तार, आरोग्य विभागाचे तथा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितु बढेल, वाशि नगरपरिषद कर्मचारी संघटना शहराध्यक्ष बबन भांदुर्गे , उपाध्यक्ष संजय काष्टे,सचिव नाजिमुद्दीन आदिंची उपस्थिती होती.


 मंगरुळपीर येथेही निषेध
मंगरुळपीर : विमा न उतरविल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर नगरपरिषद कर्मचाºयांच्यावतिने काळया फिती लावण्यात आल्या होत्या. यामध्ये मगरुळपीर  संघटनेचे अध्यक्ष रा.ना. खोडे, राजेश खंडेतोड, कैलास टांक, अंकुश गावंडे, गोविंद भोयर, राजेश संगत, सोनाली खडेकार, कैलास मेठवाणी, गजानन तिडके, सै. हमीद, विजय नाईक , माणिक भोंगळे, दिनेश व्यास, श्याम कारकल, गणेश खोडे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

शासनाचा दुजाभाव
आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग , गृह विभागासाह ईतर काही विभागातील कोव्हीड - १९ मध्ये लढणाºया कर्मचाºयांचा जीवन विभा शासनाने उतरविला. यावेळी सर्वाधिक नगरपरिषदेच्या कर्मचाºयांचा सहभाग असतांना त्यांना डावलण्यात आले आहे, हा शासनाचा दुजाभाव असल्याचा आरोप वाशिम नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गानी केला आहे.

Web Title: Municipal employees protest with black ribbons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.