खापरी सावरगाव येथे वृद्धाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:12 PM2020-08-21T12:12:17+5:302020-08-21T12:12:29+5:30
एका वृद्धाची कोयता, कुºहाड आणि काठ्यांनी मारून हत्या केल्याची, तर त्याच्या मुलास गंभीर जखमी केल्याची घटना १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव : पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या खापरी सावरगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका वृद्धाची कोयता, कुºहाड आणि काठ्यांनी मारून हत्या केल्याची, तर त्याच्या मुलास गंभीर जखमी केल्याची घटना १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांत २० आॅगस्ट रोजी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनीता समाधान पवार (३२) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा सासरा कुंडलिक मैजती पवार यांनी त्यांची मोठी भावजय बत्ताबाई प्रकाश पवार यांना तुझा नातू देविदास राठोड हा आम्हाला शिवीगाळ करीत आहे. त्याला समाजावून सांग, असे म्हणताच आरोपी सुनील प्रकाश पवार हा तेथे लोखंडी सळी घेऊन आला आणि त्याने कुंडलिक पवार यांना मारण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याचा मुलगा आरोपी परमेश्वर पवार याने सुद्धा फिर्यादीच्या सासºयासह कंठा पवार यांना काठीने मारले. रामदास सुनील पवार, निवास अभिमान राठोड, राजू निवास राठोड, यांनीही फिर्यादीचा पती समाधान कुंडलिक पवार व रंजीत पवारसह कुंडलिक पवार यांना कुºहाड, कोयता व लोखंडी सळ्यांनी मारून गंभीर जखमी केले. त्यात फिर्यादीचा सासरा कुंडलिक पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर समाधान पवार यांना गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुनील प्रकाश पवार, निवास अभिमान राठोड, परमेश्वर सुनील पवार, रामदास सुनील पवार, राजूू निवास राठोड, देविदास निवास राठोड, गंगा किशोर पवार, वजनी सुनील पवार, प्रकाश मैजती पवार, वनमाना निवास राठोड सर्व. रा खापरी सावरगाव यांच्यावर कलम ३०२, ३०७, ३२४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०८, ३४ भांदविनुसार गुन्हा दाखल करीत सर्वांना अटक केली.
मुख्य चार आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणातील चार मुख्य आरोपींना पोलीस कोठडी तर उर्वरीत महिला व वृद्ध आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.