म्यानमारमधील हिंसाचाराचा मुस्लीम बांधवांकडून  निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:22 AM2017-09-09T01:22:11+5:302017-09-09T01:22:18+5:30

बर्मा म्यानमार येथे रोहंग्या मुस्लिम बांधवांवर  होत असलेला अत्याचार आणि हिंसाचाराचा निषेध  वाशिम येथील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी  करण्यात आला. या संदर्भात त्यांच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून, या प्रकरणी  भारत सरकारने हस्तक्षेप करून मुस्लिमांवरील अ त्याचार थांबविण्यासह देशात आलेल्या शरणार्थींना  आश्रय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Muslim Brothers protest in Myanmar | म्यानमारमधील हिंसाचाराचा मुस्लीम बांधवांकडून  निषेध

म्यानमारमधील हिंसाचाराचा मुस्लीम बांधवांकडून  निषेध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांना निवेदनसरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बर्मा म्यानमार येथे रोहंग्या मुस्लिम बांधवांवर  होत असलेला अत्याचार आणि हिंसाचाराचा निषेध  वाशिम येथील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी  करण्यात आला. या संदर्भात त्यांच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून, या प्रकरणी  भारत सरकारने हस्तक्षेप करून मुस्लिमांवरील अ त्याचार थांबविण्यासह देशात आलेल्या शरणार्थींना  आश्रय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे  नमूद करण्यात आले आहे की, म्यानमार येथील  हिंसाचाराचा आम्ही भारतीय मुस्लिम समुदायाकडून  जाहीर निषेध करीत आहोत.  बर्मा येथे रोहंग्या मुस्लिम  समाजातील लहान मुले/ स्त्रियांवर गेले काही दिवसा पासून भीषण अत्याचार करून हिंसाचार करण्यात ये त आहे. यातील अनेक मुस्लिम बांधव आपला जीव  वाचवून भारतात आले आहेत. या शरणार्थी आणि  निष्पाम मुस्लिम बांधवांना केंद्र सरकारकडून त्वरित  मदत मिळवून द्यावी तसेच संयुक्त राष्ट्रे (यूनो) मार्फत  हस्तक्षेप करून त्वरित आळा घालण्यासाठी प्रयत्न  करावे. सर्व शरणार्थींना त्वरित वैद्यकीय मदत,  निवास, भोजन आदिंची सुविधा सरकारकडून  मिळावी. या निवेदनावर मो. जावेद पहेलवान, मौलवी  तस्लीम, मौलवी यासीन, अकिल चौहान, इरफान  कुरेशी, अबरार मिर्झा, आसिफ खान, मुफ्ती मोबीन,  युनूस मिर्झा, रोशन ठेकेदार, मो. मोईन, मुफ्ति आमिन,  शेख रहीम, शेख सुभान,  मिर्झा वहिद बेग आदिंची  स्वाक्षरी आहे. दरम्यान, शुक्रवारी वाशिम शहरातील  मुस्लिम बांधवांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवत  म्यानमार हिंसाचारा निषेध नोंदविला.

Web Title: Muslim Brothers protest in Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.