वाशिममध्ये मुस्लिम, चर्मकार समाजाचा मराठा आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:36 PM2018-08-08T17:36:36+5:302018-08-08T17:38:23+5:30
वाशिम : आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाचे समर्थन करित बुधवार, ८ आॅगस्ट रोजी येथील मुस्लिम समाज, चर्मकार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी हजेरी लावून जाहीर पाठिंबा दर्शविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाचे समर्थन करित बुधवार, ८ आॅगस्ट रोजी येथील मुस्लिम समाज, चर्मकार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी हजेरी लावून जाहीर पाठिंबा दर्शविला. यासह मराठा समाजातील डॉक्टरांनी देखील बुधवारी आंदोलनात उडी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, ९ आॅगस्टला पुकारण्यात आलेल्या ‘बंद’मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले.
यासंदर्भातील लेखी पत्रात वाशिममधील मुस्लिम बांधवांनी नमूद केले आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासून मराठा व मुस्लिम समाज एकत्रितरित्या हक्कासाठी लढत आले आहेत. तोच पायंडा यापुढेही कायम ठेवत समस्त मुस्लिम समाज मराठा समाजाने पुकारलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी सोबत राहणार असल्याचे मुस्लिम समाजबांधवांनी जाहीर केले. चर्मकार समाजबांधवांनीही लेखी पत्रान्वये आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा समाजातील डॉक्टरांनी देखील बुधवारी ठिय्या आंदोलनस्थळी हजेरी लावून समाजाला शासनाने विनाविलंब आरक्षण बहाल करावे, अशी मागणी लावून धरली.