ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ४ जूनला वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:47 PM2019-06-03T15:47:36+5:302019-06-03T15:48:23+5:30
मुस्लिम बांधवांना ईद या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांना त्यांचा पवित्र सण असलेली रमजान ईद आनंदात साजरी करता यावी म्हणून, ७ जूनऐवजी ४ जूनलाच त्यांना वेतन अदा करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तथापि, ३ जूनपर्यंत ज्या कर्मचाºयांनी वेतनासाठी अर्ज केले. त्यांनाच या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात
मुस्लिम धर्मात रमजान महिना आणि रमजान ईद या सणाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम बांधव हा सण आनंदात साजरा करण्यासाठी उत्सूक असतो; परंतु काही वेळी शासकीय कर्मचाºयांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडते. असा प्रकार एसटीतील मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटूंबासोबत घडू नये म्हणून एसटी महामंडळाने त्यांना निर्धारित मुदतीपूर्वी ईदीनिमित्त वेतन देण्याचे ठरविले आहे. एसटी कर्मचाºयांचे माहे मे महिन्याचे देय वेतन नियमानुसार महिन्याच्या ७ तारखेला होणार आहे; परंतु रमजान ईद हा सण त्याआधी असल्याने मुस्लिम बांधवांना या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे. याबाबत महामंडळाच्या सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठविण्यात आले असून, ३ जूनपर्यंत मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांचे वेतनासाठी विनंती अर्जही मागविण्यात आले आहेत. ज्या अधिकारी, कर्मचाºयांनी वेतन ४ जूनला मिळण्यासाठी अर्ज केले, त्यांनाच वेतन अदा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटीतील मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांची ईद आनंदात साजरी होऊ शकणार आहे.