नगर पंचायततर्फे माझी वसुंधरा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:38+5:302021-01-08T06:10:38+5:30
मानोरा नगर पंचायतीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० जानेवारीला निबंध स्पर्धा, १२ जानेवारी रांगोळी / ...
मानोरा नगर पंचायतीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० जानेवारीला निबंध स्पर्धा, १२ जानेवारी रांगोळी / चित्रकला स्पर्धा, १४ जानेवारी जिंगल ऑडिओ क्लिप स्पर्धा, १६ जानेवारी शॉर्टफिल्म / पथनाट्य स्पर्धा, १८ जानेवारीला भित्तीचित्र स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
१४ आणि १५ वय वर्षे असणाऱ्या सर्व स्पर्धकांना मानोरा नगर पंचायत प्रशासनाने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. न. पं. प्रशासनाद्वारे माझी वसुंधरा अभियानादरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, पावसाच्या पाण्याचे संकलन व संवर्धन, कचरा विलगीकरण व त्याचे फायदे, ऊर्जा स्रोत - काळाची गरज, प्लास्टीक बंदी हे विषय असणार आहेत. त्याशिवाय स्वच्छ भारत अभियान २०२१ अंतर्गत स्वच्छता अंतर्गत विविध विषयांवर स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. विजयी स्पर्धकांना न. पं. प्रशासनाद्वारे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, असे न. पं. अध्यक्ष बरखा अल्ताफ बेग, उपाध्यक्ष अमोल राऊत, आरोग्य सभापती अहमद बेग आणि न. पं. मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांनी कळविले आहे.
..............
सायकल रॅलीला प्रतिसाद
मानोरा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत २ जानेवारी राेजी सकाळी ९ वाजता सायकल रॅली काढण्यात आली. यामधे ७० विद्यार्थी तरुण सहभागी झाले होते. या वेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, नगराध्यक्ष बरखा बेग, सभापती आहेमद मिरझा, अहफाज शाह, अभियंता राजेंद्र भोरे, नागलोथ, अक्षय सोनोने, प्रमोद ढोरे आणि कर्मचारी सहभागी झाले होते.