नगराध्यक्ष, सदस्यांच्या परवानगीविना जमिनीचे अकृषक परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:30 PM2019-03-02T16:30:46+5:302019-03-02T16:30:52+5:30
मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही.
मालेगावातील प्रकार: रद्द करण्यासाठी नगर पंचायतचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही. त्यामुळे या जमिनींचे अकृषक परवाने, तसेच त्यावर अनधिकृतरित्या रोवलेले वीजखांब काढण्यासाठी नगर पंचायतने ठराव घेतला आहे. त्याशिवाय माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मिनाक्षी परमेश्वर सावंत आणि मदन राऊत यांनी महावितरणला निवेदन सादर करून हे खांब काढण्याची मागणी केली आहे.
अनेक जमिनी अकृषक करून त्यावर भुखंड पाडण्याची प्रक्रिया शहरात सुरू आहे. काही ठिकाणी एकतर्फी निर्णय घेऊन जमिनी अकृषक केल्या आहेत आणि त्यावर अनधिकृतरित्या वीजखांबही रोवून त्यावर ताराही जोडल्या आहेत. नगरपंचायत मालेगाव अंतर्गत काही ठिकाणी मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकारी नगरपंचायत मालेगाव यांनी काही व्यावसायिकांना नगरपंचायतच्या हद्दीतील सर्वे नंबर १२४ व १९० मधील जमीन निवासी प्रयोजनार्थ अभिन्यासाला मंजुरी प्रदान केली आहे; परंतु यात मुख्याधिकाºयांनी सर्वसाधारण सभेची, त्याचप्रमाणे अध्यक्ष व सदस्य यांची कोणतीही परवानगी प्राप्त केली नाही. त्यामुळे ही मान्यता रद्द करण्यात यावी यासाठी नगरपंचायत मालेगावने ठराव घेतला आहे. त्यासोबतच या अकृषक जमिनीवरील भूखंड परिसरात कोणताही ठराव न घेता वीजखांब रोवून त्यावर वीज जोडणीसाठी तारा लावल्या असल्याने हे खांब काढावे, असे निवेदन महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना यांना निवेदन सादर केले आहे. (शहर प्रतिनिधी)
मालेगाव शहरातील सर्व अकृषक परवाने नियमाच्या अधीन राहून दिले आहेत. त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन पडताळणी केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
-गणेश पांडे मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव
जमीन अकृषक करण्यासाठी नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केली असून, मुख्याधिकारी व नियोजन प्राधिकारी यांच्या परवानगीनेच कामकाज सुरू आहे, तसेच वीजखांबासाठी एक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तारा जोडण्याचे काम सुरु आहे. उर्वरित कामांना लवकरच मान्यता घेऊन ते समोर सादर केले जाणार आहेत.
-दिलीप हेडा, भूखंड व्यावसायी, मालेगाव