नाबार्डचा २०८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:12 PM2019-12-07T15:12:04+5:302019-12-07T15:12:22+5:30

२०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या संभाव्य पत पुरवठा आराखडयाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

NABARD approves Rs 2082 crore credit plan | नाबार्डचा २०८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

नाबार्डचा २०८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकरी बांधव, शेतीपुरक व्यवसाय करणारे व्यक्ती, महिला आणि पुरुषांचे बचतगट, अन्न प्रक्रिया उद्योग, फळबागांना चालना, शेतकरी उत्पादक गट तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना स्वंयरोजगार उभारण्यासाठी मदत करुन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने वाशिम जिल्हयासाठी तयार केलेला सन २०२०-२१ या वर्षाचा २०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या संभाव्य पत पुरवठा आराखडयाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, रिजर्व बँक आॅफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक बि.के. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी मोडक यांच्या हस्ते यावेळी नाबार्डच्या सन २०२०-२१ च्या संभाव्ययुक्त पतपुरवठा आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
जिल्हयाच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हयात कृषी व इतर प्राधान्य क्षेत्रामध्ये कर्ज वाटप करण्याकरीता नाबार्डमार्फत तयार करण्यात आलेला संभाव्य खर्च वितरण आराखडा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांनी सादर केला. खरीब व रब्बी हंगामातील पीक कर्ज, कृषी मुदत कर्ज, शेतीपुरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया, फळबाग लागवड, शिक्षण, घरकुल अर्थात गृहकर्ज असा प्रस्तावित २०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोडक यांनी मंजूरी दिली आहे.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक निलेश राठोड, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक आर.के. निपाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे तसेच जिल्हयातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

Web Title: NABARD approves Rs 2082 crore credit plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम