नेहरू युवा केंद्र प्रशिक्षण समारोपिय कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:39 PM2017-07-29T13:39:13+5:302017-07-29T13:39:31+5:30

naeharauu-yauvaa-kaendara-parasaikasana-samaaraopaiya-kaarayakarama | नेहरू युवा केंद्र प्रशिक्षण समारोपिय कार्यक्रम

नेहरू युवा केंद्र प्रशिक्षण समारोपिय कार्यक्रम

Next

वाशिम : नेहरु युवा केंद्रातर्फे घेतल्या जाणाºया प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २७ जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी  सकारात्मक विचार मनात बाळगुन आजच्या युवकांनी विविध क्षेत्रात आपली प्रगती साधावी.  या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशिल असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पट्टेबहादुर यांनी नेहरू युवा केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलतांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा संघटनचे महाराष्ट्र गोवा राज्याचे निदेशक उपेंद्र ठाकुर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगांवचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम, नाशिक जिल्हा युवा समन्वयक डॉ. भगवान गवई, बागलान अकॅडमीचे संचालक आनंदा महाले हे होते. नेहरू युवा स्वयसेवकांनी ग्रामीण भागात युवकांचे संघटन करुन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन सामाजिक दायित्वाचे धडे त्यांना द्यावे. असे  प्रविण पट्टेबहादुर म्हणाले.

 या नेहरू युवा प्रशिक्षण कार्यक्रमाला नेहरू युवा स्वयंसेवक देवानंद इंगोले, अजय परसे, राजेंद्र गायकवाड, आकाश काकडे, संदिप राऊत, एकनाथ राठोड, धनंजय राठोड, आशिष धोंगडे, निलेश अंभोरे, अनिल चतरकर यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगांव, औरंगाबाद या जिल्ह्यातील युवा स्वयंसेवकांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संचालन सुनिल पवार यांनी केले तर आभार मनोहर जगताप यांनी मानले.

Web Title: naeharauu-yauvaa-kaendara-parasaikasana-samaaraopaiya-kaarayakarama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.