वाशिम जिल्ह्यातील नाफेड केंद्रावरील सोयाबीनचे चुकारे प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:41 PM2018-01-04T14:41:48+5:302018-01-04T14:43:22+5:30
वाशिम: शासनाने नाफेड केंद्रावर विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विकणाऱ्या ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही.
वाशिम: शासनाने नाफेड केंद्रावर विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विकणाऱ्या ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, बाजारात सोयाबीनला चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विकण्यावर भर देत आहेत.
जिल्ह्यात नाफेडच्यावतीने यंदा २६ आॅक्टोबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी सोयाबीन विकणाºया शेतकºयांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही शासनाने केली होती. जिल्ह्यात आजवर नाफेडच्या खरेदी केंद्रांत सोयाबीनची फारशी खरेदीही झाली नाही. आजवर साडे पाच हजार क्विंटलचीच खरेदी करण्यात आली. अतिशय कमी खरेदी झाल्याने शेतकºयांचे चुकारे तात्काळ मिळणे अपेक्षीत होते; परंतु ५० पेक्षा अधिक शेतकºयांचे सोयाबीनचे चुकारे महिनाभरापासून मिळालेले नाहीत. त्यामुळे नाफेड केंद्रांवर सोयाबीन विकणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.