सोयाबीन खरेदीसाठी नाफेडला हवे ग्रेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 03:26 PM2018-11-11T15:26:10+5:302018-11-11T15:26:44+5:30
वाशिम : नाफेडच्या सोयाबीन हजारो खरेदीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तथापि, ग्रेडर नसल्याने खरेदीला अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नाफेडच्या सोयाबीन हजारो खरेदीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तथापि, ग्रेडर नसल्याने खरेदीला अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही. अकोला व वाशिम जिल्ह्यात सोयाबीन खरेदीस सुरुवात करण्यासाठी ग्रेडर उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सोयाबीनचे दर पाडून व्यापारी खरेदी करीत असल्याने शेतकºयांनी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी केली. त्यावर शासनाच्या निर्देशानुसार ११ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली. या अंतर्गत वाशिम आणि अकोला जिल्ह्यात १६ हजारांहून अधिक शेतकºयांनी नोंदणी केली. शासनाकडून सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर निश्चित करण्यात आले असताना बाजारात अधिकाधिक २२००० रुपये प्रति क्विंटलने त्यातही मोजक्याच्या प्रमाणात या भावात सोयाबीन खरेदी करून शेतकºयांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न होत असताना नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात झाली नाही. प्रत्यक्षात ही खरेदी करताना शेतमालाची प्रतवारी निश्चित करण्यासाठी ग्रेडरची आवश्यकता असते आणि अकोल, वाशिम जिल्ह्यात यासाठी ग्रेडरच नसल्याने सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात होऊ शकली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
सोयाबीनची खरेदी करण्यासाठी ग्रेडरची आवश्यकता आहे. ग्रेडरच्या नियुक्तीचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविला आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव मंजूर होताच. अकोला, वाशिममध्ये सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे.
-देवेंद्र शेकोकार
जिल्हा मार्केटिंग अधिकारी