नाफेड खरेदी बंद ; शेतकऱ्यांची लूट

By admin | Published: March 26, 2017 02:07 PM2017-03-26T14:07:09+5:302017-03-26T14:07:09+5:30

नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात तूरीची विक्री करावी लागत आहे.

Nafed purchase closed; Plunder of farmers | नाफेड खरेदी बंद ; शेतकऱ्यांची लूट

नाफेड खरेदी बंद ; शेतकऱ्यांची लूट

Next

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा, शिरपूर, अनसिंग यासह अन्य काही बाजार समिती व उपबाजारात नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात तूरीची विक्री करावी लागत आहे. हमीभाव मिळावा यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन भरघोस झाल्यामुळे यंदा दर घसरले आहेत. अडत्यांकडून तुरीला ४000 ते ४२00 रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे ३0 ते १00 क्विंटल तुरीचे उत्पादन झालेला शेतकरी शासकीय तूर खरेदी केंद्रावर गर्दी करीत आहे; परंतु १0 ते १५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अडत्यांकडे जाऊन तुरीची विक्री करीत आहेत. बाजारात तूर आणण्यासाठी द्यावे लागणारे वाहनाचे भाडे आणि मापासाठी सात ते आठ दिवस करावी लागत असलेली प्रतीक्षा लक्षात घेता, वाहनमालकाला भाडे देणे शक्य नसल्याने, किरकोळ शेतकरी अडत्याकडे जात आहेत; परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरसह इतर मालवाहू वाहने आहेत. तेच नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अडत्याच्या तुलनेत नाफेडचा भाव अधिक असल्यामुळे शेतकरी खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतिक्षा करीत आहेत.

Web Title: Nafed purchase closed; Plunder of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.