‘नाफेड’ करणार हमीदराने हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:10+5:302021-02-15T04:35:10+5:30
शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी संत गजानन महाराज नावीन्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी ...
शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी संत गजानन महाराज नावीन्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, उमरा कापसे या संस्थेला सबएजंट म्हणून नियुक्त केले आहे. वाशिम व रिसोड तालुक्यांतील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या हरभरा मालाची ऑनलाईन नोंदणीकरिता हंगाम २०२०-२१ मध्ये हरभरा पिकाची नोंदणी असलेल्या तलाठ्याकडून घेतलेला सातबारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबर नोंदणी करताना द्यावा. वाशिम तालुक्यातील शेतकरी बांधवांनी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील दुकान क्रमांक ७८ मधील संस्थेच्या कार्यालयात व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी निवासमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नत्थुजी कापसे यांनी केले आहे.