मालेगाव शहरातील बांधकामांवर राहणार आता नगर पंचायतचा‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:55 PM2017-12-08T14:55:31+5:302017-12-08T14:57:59+5:30

मालेगाव : नगर पंचायतची परवानगी घेऊनच यापुढे मालेगाव शहरात घर किंवा अन्य प्रकारचे बांधकाम करावे लगाणार आहे. विना परवाना बांधकामे हुडकून काढण्यासाठी नगर पंचायतने पाहणी मोहिम हाती घेतली असून, यामुळे अवैध बांधकाम करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

Nagar Panchayat's 'watch' will now be on construction in Malegaon city | मालेगाव शहरातील बांधकामांवर राहणार आता नगर पंचायतचा‘वॉच’

मालेगाव शहरातील बांधकामांवर राहणार आता नगर पंचायतचा‘वॉच’

Next
ठळक मुद्दे विना परवाना बांधकामे हुडकून काढण्यासाठी नगर पंचायतने पाहणी मोहिम हाती घेतली आहे.अतिरिक्त मजले  वाढविताना नगरपंचायत प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.परवानगी न काढल्यास धडक कारवाई करण्याचा इशारा नगर पंचायत प्रशासनाने दिला आहे.

मालेगाव : नगर पंचायतची परवानगी घेऊनच यापुढे मालेगाव शहरात घर किंवा अन्य प्रकारचे बांधकाम करावे लगाणार आहे. विना परवाना बांधकामे हुडकून काढण्यासाठी नगर पंचायतने पाहणी मोहिम हाती घेतली असून, यामुळे अवैध बांधकाम करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

मालेगाव शहरात स्वत:च्या जागेत बांधकाम करताना तसेच इमारतीवर पुनश्च बांधकाम करुन अतिरिक्त मजले  वाढविताना नगरपंचायत प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना मालेगाव शहरात पूर्वपरवानगी न घेताच स्वत:च्या जागेत विनापरवाना अवैधरित्या बांधकाम मोठया प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी मोलगाव नगर पंचायतला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने नगर पंचायतने प्राथमिक टप्प्यात पाहणी मोहिम हाती घेतली आहे. पुर्व परवानगीशिवाय बांधकाम करणाºयांना लेखी पत्र देवून काम थांबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सुचनेऊपरही काही नागरिकांनी परवानगी न काढल्यास धडक कारवाई करण्याचा इशारा नगर पंचायत प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, परवानगी न घेता बांधकाम सुरू ठेवणाºया दोघांविरूद्ध गुन्हे दाखल झाल्याने मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली. आपल्यावरही गुन्हे दाखल होऊ नये किंवा अन्य प्रकारची कारवाई टाळण्यासाठी काही जणांनी परवानगी काढण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाकडे धाव घेतल्याचे दिसून येते.

Web Title: Nagar Panchayat's 'watch' will now be on construction in Malegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.