नागपंचमीला ग्रामीण भागात पत्ते खेळण्याची प्रथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:18 AM2017-07-27T02:18:57+5:302017-07-27T02:19:01+5:30

at Nagpanchami playing cards in rural areas! | नागपंचमीला ग्रामीण भागात पत्ते खेळण्याची प्रथा!

नागपंचमीला ग्रामीण भागात पत्ते खेळण्याची प्रथा!

Next
ठळक मुद्दे अनेक गावात रंगणार डाव : पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा असुन यात तरूणांसह वृध्दांचाही समावेश असतो. मात्र, या परंपरेला वेगळे वळण लागत असून नागपंचमीचा सन संपल्यानंतरही अनेक गावांत पत्त्याचे डाव रंगतात.
पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व असले तरी काही कुप्रथाही अनेक वषार्पासून रूढ झाल्या आहेत. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी ‘पत्ते पंचमी’ साजरी करीत दिवस-रात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयांची उलाढाल करून कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतात.
जुगाºयाना पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला वाशिम शहरासह प्रत्येक तालुक्यात गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात. जिल्ह्यातील अनेक गावामध्ये तर या डावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप येते. यात एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.ग्रामीण भागात दिवस उगवल्यापासूनच सर्रासपणे कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होते.
शहरासह ग्रामीण भागात या दिवशी खेळल्या जाणाºया जुगाराकडे पोलिसांचाही काना डोळा असतो. नागपंचमीच्या दिवशी सुरू असलेल्या या पत्ते पंचमीच्या खेळात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दिवस आणि रात्रभर खेळल्या जाणाºया या पत्त्यांच्या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होते. गेल्या अनेक पिढ्यांपासुन घरात ‘नागपंचमी’ तर गावात सार्वजनिक ‘पत्तेपंचमी’ साजरी होताना दिसून येत आहे. पत्त्यांच्या या खेळांमुळे तरुणपिढी व्यसनाधीन होऊन नादी लागत आहे. जुगाराच्या या खेळात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. गत दोन ते तीन वर्षाआधी पोलीस विभागाच्यावतिने या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. याहीवर्षी जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी या प्रकाराकडे लक्ष दिल्यास याला आळा बसू शकतो.

ही प्रथा घातक..
सणासुदीच्या दिवसाला वेगवेगळया प्रथा लागल्या आहेत. परंतु अनेक गावात नागपंचमीदिनी पत्ते खेळण्याची एक वेगळीच प्रथा असल्याने यामध्ये तरुण पिढी याच्या आहारी जात असल्याने त्यांचे जिवन उध्दवस्त होत आहे. याकडे संबधितांनी लक्ष देवून या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने याकडे लक्ष देवून हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे.

लोण शहराकडे ...
नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याचे लोण हे शहरातही येत आहे. वाशिम शहरातीलही अनेक भागात नागपंचमीच्यादिवशी पत्ते खेळल्या जात आहे.

Web Title: at Nagpanchami playing cards in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.