कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नाला खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:39+5:302021-02-15T04:35:39+5:30
------------ कारंजात आणखी १२ बाधित कारंजा: तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे सत्र सुरूच असून, शनिवार रविवारी मिळून शहरातील ५, ...
------------
कारंजात आणखी १२ बाधित
कारंजा: तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे सत्र सुरूच असून, शनिवार रविवारी मिळून शहरातील ५, आखतवाडा येथील १, दोनद येथील १ खडी येथील १, मनभा येथील २, दुधोरा येथील १, धानोरा आणि येथील १, असे १२ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
------------
रोहित्र दुरुस्तीची मागणी
वाशिम: तालुक्यातील १२ गावांतील रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडथळे येत असून, भाजीपाला पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे हे रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
------------
सोनोग्राफी सुविधेचा अभाव
वाशिम: जिल्हा सामान्य रुग्णालय वगळता जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालयांत सोनोग्राफी सुविधेचा अभाव आहे. काही ठिकाणी मशीन नाही, तर काही ठिकाणी तंत्रज्ञ नसल्याने गोरगरीब महिलांना मोठा खर्च करून खासगीत तपासणी करावी लागत आहे.
------------
ऊस उत्पादकाला मदतीची प्रतीक्षा
शेलूबाजार: परिसरात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतीतील उसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला माहिती देऊन आर्थिक मदतीची मागणी केली; परंतु अद्यापही (१४ फेब्रुवारी) त्यांना कुठलीच मदत मिळाली नाही.
--------------
महामंडळासाठी भांडवलाची मागणी
वाशिम: मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला ३ हजार कोटींचे भागभांडवल पुरविण्याची मागणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ बचाव आंदोलन कृती समितीने केली आहे.
===Photopath===
140221\14wsm_2_14022021_35.jpg
===Caption===
नाला खोलीकरण