‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:05 PM2019-04-08T18:05:15+5:302019-04-08T18:05:22+5:30

वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.

 In the name of 'Acche Din' Modi government has fooled the people - Dhananjay Munde | ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

googlenewsNext

- नंदकिशोर नारे

वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राकाँं आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ८ एप्रिल रोजी वाशिम येथे आले असता ते बोलत होते.
पुढे बोलतंना धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, देश बदल रहा है, पंरतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. उलट खोटी आश्वासने व फसव्या घोषणा करुन महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बरोजगारी वाढली आहे, असे सांगून जनतेला प्रश्न केला की, मोदी सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात एक तरी व्यक्ती सांगा कोणाला फायदा झाला. त्यावेळी जनतेतून जोराने ‘नाही’ अशा घोषणा देण्यात आल्यात. काँग्रेसचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी महागाई आटोक्यात होती. सरासरी ५० रुपये पेट्रोलचे दर होते. आज हे भाव सरासरी ८० रुपयावर गेले आहेत. एका व्यक्तिला दररोज समजा एक लिटर पेट्रोल लागत असेल तर ५ वर्षात मोदी सरकारने तुमच्या खिशातील किती रुपये नेलेत. हे घरी गेल्यानंतर हिसोब करुन मला सांगा. गॅस सिलिंडरची त्यावेळीची किंमत व आजची किंमतमधील तफावत पहा महागाई कोणी वाढविली हे कोणाला सांगण्याची गरज पडणार नाही. एका व्यक्तिमागे २ लाख रुपयाची लूट मोदींनी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस - राष्टÑवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्यावेळी कोणाला रांगेत उभे केले नाही.  यावेळी त्यांनी नोटबंदी, स्कील इंडिया, मेकिंग इंडिया आदींवर घणाघाती टीका केली.

Web Title:  In the name of 'Acche Din' Modi government has fooled the people - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.