‘शौचालय’च्या नावावर शहरी भागात अर्जांचा ‘गोरखधंदा’!

By admin | Published: September 28, 2016 01:36 AM2016-09-28T01:36:10+5:302016-09-28T01:36:10+5:30

‘ऑनलाइन’ अर्जासाठी २00 रुपयांची मागणी; ‘लोकमत’ने केला प्रकार उघड.

In the name of 'toilet' applications 'Gorakhadhanda' in the urban areas! | ‘शौचालय’च्या नावावर शहरी भागात अर्जांचा ‘गोरखधंदा’!

‘शौचालय’च्या नावावर शहरी भागात अर्जांचा ‘गोरखधंदा’!

Next

सुनील काकडे
वाशिम, दि. २७- शौचालय बांधकामासाठी २५ हजार रुपये अनुदान मिळवून देण्याची बतावणी करून काही इसमांनी शहरी भागात पैसे लाटण्याचा ह्यगोरखधंदाह्ण सुरू केला आहे. यासाठी प्रती लाभार्थी २00 रुपये घेतले जात असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने २७ सप्टेंबर रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान उघडकीस आला.
राज्यशासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरी भागात वैयक्तिक शौचालय योजना राबविली जात आहे. यासाठी ज्यांच्या घरी अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही आणि जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशा लाभार्थींचा सर्व्हे करून त्यांना शौचालय उभारण्याकरिता शासनाकडून देय असलेले १२ हजार रुपये आणि नगर परिषदेकडून दिले जाणारे प्रोत्साहनपर ५ हजार रुपये, असे एकंदरित १७ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. असे असले तरी नगर परिषदांकडून शहरी भागात ही योजना फारशी गांभीर्याने राबविली जात नसून शौचालयाचा लाभ मिळण्याकरिता दाखल केलेला प्रस्ताव वेळेत निकाली निघत नसल्याची ओरड सर्वच स्तरांतून होत आहे. यामुळे बहुतांश लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, शहरातील गरजू लाभार्थींच्या याच मानसिकतेचा गैरफायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून काही इसम आर्थिक लाभ करून घेण्याच्या उद्देशाने पुढे सरसावले असून, घरोघरी फिरून शौचालय उभारण्याकरिता नगर परिषदेकडून २५ हजार रुपये मिळवून देण्याची बतावणी केली जात आहे. यासाठी संबंधित कुटुंबाकडून २00 रुपयांची मागणी करून अर्ज भरून घेतले जात असल्याची बाब मंगळवारी ह्यलोकमत स्टिंग ऑपरेशनह्णमध्ये उजागर झाली. तथापि, या गंभीर प्रकाराकडे जिल्ह्यातील नगर परिषदांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून जोर धरत आहे.

Web Title: In the name of 'toilet' applications 'Gorakhadhanda' in the urban areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.