१८९५ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:56 PM2020-12-26T17:56:24+5:302020-12-26T17:56:31+5:30

Washim News कारंजा तालुक्यातील १८९५ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.

The names of 1895 people will be removed from the voter list | १८९५ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार

१८९५ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार

Next

वाशिम : छायाचित्र नसणे, पत्त्यावर न राहणे आदी कारणावरून कारंजा तालुक्यातील १८९५ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत याप्रकरणी आक्षेप मागविण्यात आले आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा करून १८९५ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी कारंजा तहसिलकडे प्रस्ताव सादर केला आहे. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसणाऱ्या मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या; मात्र मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे छायाचित्र संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. या १८९५ व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: The names of 1895 people will be removed from the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.