छायाचित्र नसलेली नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:18 AM2021-02-18T05:18:05+5:302021-02-18T05:18:05+5:30
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावणे हे कर्तव्य मानले जाते. दरम्यान, नवीन नियमानुसार मतदार यादीत छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले ...
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावणे हे कर्तव्य मानले जाते. दरम्यान, नवीन नियमानुसार मतदार यादीत छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मतदार यादीत ते नसेल तर मतदाराची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. रिसोड तालुक्यामध्ये मतदार यादी फोटोसह पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे . ३३ रिसोड विधानसभा मतदार संघअंतर्गत रिसोड तालुक्यात एकूण १७३ मतदान केंद्राच्या यादीत ३४७१ मतदाराचे मतदान यादीत छायाचित्र नाही. त्यांच्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. तलाठी यांच्यामार्फत गृह भेटीदरम्यान सदर फोटो नसलेले मतदार तिथे राहात नसल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे कटाक्षाने वगळली जाणार आहेत. मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे, यासाठी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करुन तहसिल कार्यालयात जाऊन यादी पाहावी व ज्यांच्या नावापुढे छायाचित्रे नाही, अशा मतदारांनी २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत फोटोमागे नाव लिहून गावातील, भागातील बीएलओ अथवा तहसिल कार्याल रिसोड येथे निवडणूक विभागात जमा करावे, असे आवाहन तहसिलदार रिसोड तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अजित शेलार, नायब तहसिलदार लक्ष्मण बनसोडे व महसुल सहायक संदीप काळबांडे यांनी केले आहे.