नांदेड-जम्मू तावी ‘हमसफर एक्स्प्रेस’ झाली हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:45 PM2019-03-18T15:45:15+5:302019-03-18T15:46:29+5:30
वाशिम : नांदेड येथून दर शुक्रवारी सुटणाऱ्या नांदेड-जम्मू तावी - हू.सा. नांदेड ‘हमसफर एक्स्प्रेस’ या गाडीला आता अत्याधुनिक सुविधायुक्त डब्बे बसविण्यात आले आहे
- शिखरचंद बागरेचा
वाशिम : नांदेड येथून दर शुक्रवारी सुटणाऱ्या नांदेड-जम्मू तावी - हू.सा. नांदेड ‘हमसफर एक्स्प्रेस’ या गाडीला आता अत्याधुनिक सुविधायुक्त डब्बे बसविण्यात आले आहेत. यात आग लागल्याच्या माहितीपासून ते प्रसाधनगृहातील स्वच्छतेच्या सुविधेचा समावेश आहे.
‘व्हेरी अर्ली स्मोक डिटेक्शन अर्लाम’ म्हणजेच या ‘वेस्टा’ ही सुविधा या गाडीत असणार आहे. त्याशिवाय ‘ग्लोबल पोशिशनिंग सिस्टम’ अर्थात ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे, त्यामुळे गाडी कुठे आहे, येणारे स्टेशन कोणते आहे आणि इतरही माहिती प्रवाशांना सहज मिळते. ‘आॅटोमेटेड डोअर्स’ ही सुविधाही या गाडीच्या डब्यांना आहे. त्यामुळे दरवाजे आपोआप बंद होतात, अशी माहिती नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी दिली.