नांदु-याच्या महिलेची होणार ‘एचएलए टायपिंग टेस्ट’
By admin | Published: December 9, 2015 02:56 AM2015-12-09T02:56:47+5:302015-12-09T15:47:24+5:30
किडनी तस्करी प्रकरण; शांताबाई खरातच्या किडनीचा लागणार शोध.
सचिन राऊत / अकोला : किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित शांताबाई खरात यांच्या किडनीचे प्रत्यारोपण नांदुरा येथील एका महिलेच्या शरीरात करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीवरून पोलीस नांदुरा येथील महिलेची लवकरच ह्यहय़ुमन ल्युकोसाईट अँन्टीजेन रिस्पॉन्सिबल फॉर इमिन्यू सिस्टीम रेग्युलेशन्सह्ण (एचएलए टायपिंग टेस्ट) करणार आहेत. या टेस्टमधून या माहितीवर शिक्कामोर्तब होण्यास मदत होणार आहे.
अकोल्यातील रहिवासी आनंद जाधव हा अवैध सावकारीच्या माध्यमातून गरीब रुग्णांना किडनी देण्यास हतबल करायचा. देवेंद्र शिरसाटच्या मदतीने तो किडनीसाठी ग्राहक शोधायचा. ग्राहक शोधल्यानंतर सांगलीचा शिवाजी कोळी हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत होता. या किडनी तस्करांनी जुने शहरातील पाच जणांच्या किडन्या अशाच प्रकारे काढल्या आहेत. त्यापैकी शांताबाई खरात यांची किडनी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली असून, या किडनीचे नांदुरा येथील एका महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी शांताबाई खरातची किडनी बुलडाणा जिल्हय़ातील नांदुरा येथील महिलेच्या शरीरात आहे किंवा नाही, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन एचएलए टायपिंग टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी नांदुर्याच्या महिलेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ह्यअल्ट्रासाऊंड सोनोग्राफीह्ण करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये महिलेच्या शरीरात किती किडनी आहेत, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे किंवा नागपूरमध्ये एचएलए टायपिंग टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
*अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीही महत्त्वाची
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये व्यक्तीच्या शरीरात किती किडनी आहेत, हे स्पष्ट होते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असल्यास तिसर्या किडनीचे प्रत्यारोपण केली आहे किंवा नाही हे स्पष्ट होते. हे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात नेमकी कुणाची किडनी आहे, हे शोधण्यासाठी एचएलए टायपिंग टेस्ट महत्त्वाची ठरते.
*तीन सदस्यीय समितीचा अहवाल सादर
जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी किडनी तस्करी प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना एक प्रश्नावली पाठवली होती. या प्रश्नावलीमधील तांत्रिक मुद्दय़ांवर मार्गदर्शन तसेच कायदेशीर बाजू तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची मार्गदर्शक तत्त्वे यांचा अभ्यास करून तीन सदस्यीय समितीने हा अहवाल मंगळवारी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. या समितीमध्ये औषध वैद्यकशास्त्र डॉ. बनसोड, शल्यचिकित्सक डॉ. आनंद डवंगे व न्यायवैद्यकशास्त्र डॉ. रवी मेश्राम यांचा समावेश होता. या समितीने तीन दिवसांमध्ये हा अभ्यासपूर्ण अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला.