रासेयो स्वयंसेवकांनी घेतली स्वच्छतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 07:56 PM2017-08-10T19:56:40+5:302017-08-10T19:57:27+5:30
कारंजा लाड : श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या रासेयो पथकाव्दारे स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. यामध्ये बसस्थानक ,रेल्वेस्थानक, बाजारपेठ, गलीच्छ वस्ती, महाविद्यालय परिसर इत्यादी स्वच्छ करण्याचे लक्ष रासेयो पथकाने घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महाविद्यालयामध्ये झालेल्या स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा उपक्रमांतर्गत स्वच्छत९ची शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच ेप्राचार्य डॉ.सुभाष गवई होते. प्रमुख उपस्थिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती रासेयोचे लेखाधिकारी राजाभाऊ पिदडी होते तसेच प्रा.कैलास गायकवाड, प्रा.डॉ.अशोक जाधव यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. संत गाडगेबाबा व महात्मा गाधी यांच्या प्रतिमेला वंदन करुन स्वच्छतेची श्पथ घेण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी राजाभाऊ पिदडी यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाकरिता रासेयोचे विचारमंच किती महत्वाचे आहे हे विविध दाखले व शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.सोबतच त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका खडसे, रेखा पुसंडे, राणी ढोके, चंदा इंगळे, दिपाली कडू, अविनाश जिरे, आकाश चव्हाण, चेतन सावरकर, वैष्णवी खंडागळे, सरिता चव्हाण, आरती डोंगरे, राहूल राठोड, मयुर वडते ,निखील नितनवरे,संतोष चव्हाण इत्यादी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.