राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नाशिक, अकोल्याचा डंका

By संतोष वानखडे | Published: July 27, 2024 02:16 PM2024-07-27T14:16:55+5:302024-07-27T14:17:21+5:30

वाशिम - राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील निर्देशकांवर आधारीत मे महिन्यातील जिल्हा शल्य चिकित्सक (सी.एस.) व जिल्हा आरोग्य अधिकारी (डी.एच.ओ.) संवर्गातील रॅंकिंग ...

Nashik, Akola in implementation of National Health Programme | राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नाशिक, अकोल्याचा डंका

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नाशिक, अकोल्याचा डंका

वाशिम - राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील निर्देशकांवर आधारीत मे महिन्यातील जिल्हा शल्य चिकित्सक (सी.एस.) व जिल्हा आरोग्य अधिकारी (डी.एच.ओ.) संवर्गातील रॅंकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आले असून, त्याची घोषणा २५ जुलै रोजी करण्यात आली. सी.एस. संवर्गातून नाशिक तर डी.एच.ओ. संवर्गातून अकोला प्रथम स्थानी असून, वाशिम व धाराशिव द्वितीय स्थानी आहे.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृ स्वास्थ्य, मुलाचे आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, किशोरवयीन आरोग्य, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, आशा कार्यक्रम, प्रशासन, मोफत निदान सेवा यांसह एकूण ३० निर्देशकांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत डीएचओ व सीएसच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली जाते. मे २०२४ मध्ये विशेष चमूमार्फत पाहणी व पडताळणी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील रॅंकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आले. २५ जुलै रोजी जिल्हानिहाय रॅंकिंग जाहिर झाले असून, सी.एस. संवर्गातून नाशिक प्रथम तर वाशिम द्वितीय आणि डी.एच.ओ. संवर्गातून अकोला प्रथम तर धाराशिव द्वितीय स्थानी आहे.

......................

गुणानुक्रमे पहिले ५ ‘डिएचओ’ व ‘सीएस’

अ.क्र. / डीएचओ / गुण / सीएस / गुण
१ / अकोला /५५.४२ / नाशिक /४०.८५

२ / धाराशीव / ४९.२८ /वाशिम / ४०.६६
३ / धुळे /४५.७७ /कोल्हापूर / ३९.३८

४ / अहमदनगर / ४५.७७ / अकोला /३७.८०
५ / नागपूर /४५.५१ / हिंगोली /३७.५९

............
गुणानुक्रमे शेवटचे ५ ‘डिएचओ’ व ‘सीएस’

अ.क्र. / डीएचओ / गुण / सीएस / गुण
३० / रत्नागिरी /३४.६८ / पुणे /२७.४५

३१ / अमरावती / ३३.९६ / यवतमाळ / २६.९९
३२ / कोल्हापूर / ३३.९३ /जालना / २६.७५

३३ / यवतमाळ / ३३.४५ / नागपूर / २६.७५
३४ / नंदूरबार /३०.१६ / पालघर /२६.१४

...........
पाच सीएस व डीएचओंना ताकीद

रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ व नंदूरबार जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पुणे, यवतमाळ, जालना, नागपूर व पालघर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम अंमलबजावणीकडे लक्ष देवून सुधारणा करावी अशा शब्दात राज्याच्या आरोग्य संचालकांनी ताकीद दिली आहे.

Web Title: Nashik, Akola in implementation of National Health Programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम