वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:06 PM2018-02-27T15:06:55+5:302018-02-27T15:06:55+5:30
वाशिम - राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले.
वाशिम - राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करण्यात आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासह ओबीसींच्या इतर स्थानिक मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे भविष्य संपविणाºया तसेच ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाºया सरकारचा निषेध असो, अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. धरणे आंदोलनानंतर सायंकाळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे, राजू गुल्हाने, मनिष चिपडे, अनंत काळे, विपुल नाथे, मोरेश्वर फटींग, प्रशांत वानखेडे, पवन राऊत, पांडुरंग महल्ले, संजय मापारी, स्वप्निल गव्हाळे, शिवाजी महल्ले, उल्हास घुगे, गजानन ठाकरे, सुधाकर कड, राजगुरु, सुनील गायकवाड, अजाब कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.