वाशिमच्या शाळेत राष्ट्रीय हरित सेनेने विद्यार्थ्यांना वाटली रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:20 PM2017-11-08T13:20:21+5:302017-11-08T13:21:34+5:30
वाशिम: स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिक मासातील तुळशी विवाहनिमित्त राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको-क्लबच्या विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले.
वाशिम: स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिक मासातील तुळशी विवाहनिमित्त राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको-क्लबच्या विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बिना बोने, किरण देशमुख, कुसुम मापारी, प्रतीक्षा कान्हेड, अनुराधा दायमा उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करुन तुळशीच्या रोपांची लागवड सुध्दा करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांनी केले होते. कार्यक्रमासाठी निसर्ग इको क्लबची विद्यार्थिनी हषार्ली गोरे, रेणुका जांगीड, नूतन देशमुख, नेहा वानखेडे, गौरव भाकरे, पुनित खडसे, विशाल वानखेडे, समर इंगळे, वैष्णवी इढोळे, अनुष्का कावरखे, ऋतुजा पंडीत, आरती वाझुळकर, सानिका गोरे, रिझा हुसेन, अंजली आरु, प्रियंका सिरसाट, मेघना शर्मा, तनुजा भिसे, जान्हवी वानरे, देव बंग, ओम नागुलकर, दर्शन वानखेडे, दुर्गेश धनोकार, निरंजन रिसाट आदिनी सहकार्य केले.